Ad will apear here
Next
पॅरलल वायरलेसचे अत्याधुनिक केंद्र पुण्यात स्थापन
पश्चिम भारतासाठीचे सर्वांत मोठे केंद्र
पॅरलल वायरलेसच्या पुण्यातील केंद्राचे उद्घाटन करताना सहसंस्थापक केतकी अगरवाल व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कीथ जॉन्सन,

पुणे : पॅरलल वायरलेस आयएनसी या ओपनरॅन सोल्युशन्स (फाइव्ह जी, फोर जी, थ्री जी, टू जी आणि वायफाय तंत्रज्ञान) देणाऱ्या अमेरिकास्थित कंपनीने आपले पश्चिम भारतासाठीचे सर्वांत मोठे केंद्र पुण्यात सुरू केले आहे. पॅरलल वायरलेसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कीथ जॉन्सन यांच्या हस्ते नुकतेच या केंद्राचे उद्घाटन झाले. या वेळी सहसंस्थापक केतकी अगरवाल, संजय हरवाणी, अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.  

‘पाच जागतिक मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्या पॅरलल वायरलेस ओपनरॅन सोल्युशन्स अवलंबण्यासाठी चाचण्या घेत असून, त्यांना सेवा देण्याचे काम या केंद्राद्वारे केले जाणार आहे. तब्बल ३१ हजार २०० चौरस फूट क्षेत्रावर पसरलेल्या या केंद्रात आणखी ४० टक्के कर्मचारी संख्या वाढवता येणार आहे. यामुळे फाइव्ह जी नेटवर्क उपलब्ध करण्याबरोबर नेटवर्क अधिक अत्याधुनिक करण्याच्या धोरणाला गती मिळेल, तसेच वार्षिक ५० टक्के वाढीचे उद्दिष्ट गाठणे कंपनीला शक्य होईल,’असे कीथ जॉन्सन यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘आमचे कर्मचारी ही आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि कटिबद्धतेमुळे आम्ही ओपनरॅन सोल्युशन्सचे आघाडीचे पुरवठादार बनलो आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्कृष्ट वातावरण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचे पुण्यातील हे नवे केंद्र याच तत्त्वावर आधारित आहे. कामकाजाच्या ठिकाणाचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी काम आणि खासगी आयुष्य यांचे संतुलन आणि त्यांना उत्कृष्ट कामगिरी बजावता यावी यासाठी आम्ही नेहमीच पाठबळ देत राहू.’



पॅरलल वायरलेसच्या इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष संजय हरवाणी म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता जपणे हे आमचे मुख्य तत्त्व आहे. आमच्या कंपनीतील ६० टक्के भारती ही रेफरन्समधून होते. काम आणि आयुष्य यांचे संतुलन साधण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांना नेहमीच पाठबळ देतो, त्यामुळे आमच्याकडे काम करण्यास उत्सुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच कंपनी सोडून जाणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. आम्ही कर्मचारी संख्या वाढवत असून, पात्र उमेदवारांना आमच्या वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.’  

या अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या केंद्रात सुसज्ज प्रयोगशाळेसह सर्व त्या सोयी सुविधा असून, कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उत्तम वातावरण आहे. या केंद्रात विकास केंद्र, दर्जा हमी विभाग आणि सिस्टीम इंजिनीअरिंग असे तीन विभाग आहेत. सर्वांमधील समन्वय वाढावा या दृष्टीने या नवीन कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. पॅरलल वायरलेसचे हे केंद्र नाविन्यपूर्ण उत्पादन आणि ओपनरॅन सोल्युशन्सच्या विकसनावर भर देणार आहे. पॅरलल वायरलेसचे नावीन्यपूर्ण, स्वस्त आणि बहुआयामी ओपनरॅन सोल्युशन दूरसंचार कंपन्यांना सॉफ्टवेअर आधारित आधुनिक तंत्रज्ञान किफायतशीरपणे उपलब्ध करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. सहा खंडांमधील अनेक आघाडीच्या कंपन्या पॅरलल वायरलेसच्या ग्राहक असून, यात टेलिफोनिका, एमटीएन, व्होडाफोन, सेलकॉम, ऑप्टस, इनलँड सेल्युलर, झेन आदींचा समावेश आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZTLCE
Similar Posts
‘युएसए’ आणि भारतीय विद्यार्थ्यांची सामूहिक कार्यशाळा पुणे : पुराणिक फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत येथील समर्थगड येथे ‘युएसए’ आणि भारतीय विद्यार्थ्यांची सामूहिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत पुण्याच्या कामगारांची बाजी पुण्यातील रमजान मोमीन आणि मोहम्मद राबिथ कुन्नमपल्ली या बांधकाम कामगारांनी डेन्मार्कमध्ये नुकत्याच झालेल्या ‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे.
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील जागतिक संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना यश पुणे : ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे मानवी समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत पुण्यातील आनंद ललवाणी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको! पुणे : सध्याच्या जगात मानसिक आरोग्य सांभाळण्याचे मोठे आव्हान मानवजातीसमोर उभे आहे. स्पर्धा, ताणतणाव, इंटरनेट, मोबाइल गेम्सचा अति वापर अशा अनेक कारणांमुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण होत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language